आता भाजपसाठी बॅटिंग करणार गौतम गंभीर

gautam-gambhir
नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, रवीशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपमध्ये गौतम गंभीरने प्रवेश केल्यामुळे त्याचा फायदा नक्कीच पक्षाला होईल असा विश्वास अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे. मी भाजपत प्रवेश नरेंद्र मोदींच्या कामापासून प्रभावित होऊन केला असल्याचे गौतम गंभीरने यावेळी म्हटले आहे. त्याचबरोबर मला देशासाठी काम करण्याची संधी दिल्याबद्दल भाजपचे आभार देखील मानले.

लोकसभा निवडणुकीचे तिकीट गौतम गंभीरला देण्यासंबंधी बोलण्यास यावेळी अरुण जेटली यांनी नकार दिला. निवडणूक समितीवर तिकीट देण्यासंबंधीचा निर्णय सोडून देऊयात. योग्य ती जबाबदारी गौतम गंभीर यांना देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले. दिल्लीतील सर्व जागांवर लोकसभा निवडणुकीत विजयी पताका फडकवण्यासाठी भाजप पुरेपूर प्रयत्न करत असून काही मोठे बदल केले जात असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे.

Leave a Comment