जाणून घेऊ या पेगन डायट विषयी

diet
निरोगी व सुदृढ शरीरासाठी योग्य आणि संतुलित आहाराचे महत्व आपल्याला ठाऊकच आहे. त्यासाठी निरनिरळ्या आहारपद्धती अवलंबल्या जात असतात. आहार पद्धतीचा अवलंब करताना एकंदर प्रकृती, आपल्याला असलेले विकार, आपली जीवनशैली आणि आपला दिनक्रम लक्षात घेता आपली दैनंदिन कॅलरीजची आवश्यकता या सर्व गोष्टींचा विचार करून आहारपद्धतीची निवड केली जाणे गरजेचे असते. शरीर निरोगी आणि सुदृढ ठेवण्यासाठी निरनिराळ्या आहारपद्धती अस्तित्वात आहेत. त्याच आहारपद्धतींपैकी एक आहे, सध्या लोकप्रिय होत असलेले, ‘पेगन डायट’. या डायटबद्दल जाणून घेऊ या.
diet1
पेगन डायट हे पॅलियो आणि व्हेगन आहारपद्धतींचे मिश्रण म्हणता येईल. पॅलियो डायटमध्ये जास्त भर प्रथिनांवर असून, यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण कमी असते, तर व्हेगन डायट मध्ये मांसाहार आणि दुध व दुग्धजन्य पदार्थ, तसेच प्राण्यांपासून मिळालेले सर्व पदार्थ वर्ज्य आहेत. या दोन्ही डायटचे मिश्रण पेगन डायटमध्ये पहावयास मिळते. पेगन डायटमध्ये ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. किंबहुना पेगन डायटमध्ये व्यक्तीच्या एकूण आहाराच्या २/३ हिस्सा भाज्या आणि फळांचा असायला हवा. यामुळे शरीराला आवश्यक क्षार, जीवनसत्वे, आर्द्रता आणि फायबर मिळते. तसेच माफक प्रमाणांत शरीराला आवश्यक असणारी कर्बोदके बीट, बटाटा या भाज्यांद्वारे मिळतात.

सेलिब्रिटी डायट कितपत भरोशाची?

diet2
या आहारामध्ये प्रथिने ही मांसाहार, किंवा दुध व दुग्धजन्य पदार्थांमधून मिळवायची नसून, शाकाहारामधून मिळवायची असल्याने आहारामध्ये कडधान्ये, डाळी, सुकामेवा, इत्यादी पदार्थांचा समावेश करायचा आहे. ज्या व्यक्ती मांसाहारी आहेत, आणि ज्यांना शाकाहाराचा अवलंब करणे शक्य नाही, त्यांनी आहारामध्ये अंडी, मासे, चिकन इत्यादी पदार्थांचा समावेश करावा. तसेच या अन्न शिजविण्यासाठी रिफाईन्ड तेलाचा वापर न करता नारळाचे किंवा तिळाचे तेल, अथवा घरच्या साजूक तुपाचा वापर करावा.
diet3
सर्व आहारपद्धतींचे असतात तसे या आहारपद्धतीचे देखील फायदे आणि तोटे आहेत. सर्वात मोठा फायदा म्हणजे या आहारपद्धतीमध्ये प्रोसेस्ड (साखर, मैदा इ.) किंवा तेलकट, गोड पदार्थ वर्ज्य असल्याने या डायटमुळे वजन नियंत्रणात ठेवणे शक्य होते. ही आहार पद्धत अवलंबल्याने शरीराची चयापचय शक्ती सुधारते. तसेच या आहारामध्ये प्रथिने जास्त असली, तरी कर्बोदके, स्निग्ध पदार्थ ही घ्यायचे असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा पदार्थ संपूर्ण वर्ज्य करण्याची आवश्यकता नाही. या डायटचा तोटा फारसा नसला, तरी या डायटमध्ये मांसाहार शक्यतो वर्ज्य करायचा असल्याने मांसाहारी लोकांसाठी हे डायट सांभाळणे थोडेसे कठीण होऊ शकते. तसेच या आहारामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असलेल्या भाज्यांचे सेवन अतिशय मर्यादित प्रमाणात करायचे असल्याने त्याकडे विशेष लक्ष देणेही आवश्यक ठरते.

नेमक आहे तरी काय डब्रो डायट ?

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment