मोदींच्या बायोपिकचा ट्रेलर तुमच्या भेटीला

biopic
बॉलीवूडमध्ये बायोपिकची लाट आल्याचे आपल्याला माहितच आहे. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित बहुप्रतिक्षीत बायोपिक ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाच्या ट्रेलरविषयी सर्वाधिक उत्सुकता होती. या बायोपिकमध्ये बालपणापासून ते देशाचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा मोदींचा प्रवास दाखवण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये याची झलक पाहायला मिळत आहे.

मोदींच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. ५ एप्रिलला ओमंग कुमार दिग्दर्शित हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. या चित्रपटात एक सामान्य चहा विक्रेता ते सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाचा पंतप्रधान असा प्रवास पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये त्यांच्या या प्रवासात मार्गात येणाऱ्या अडचणी, निर्माण होणारे वाद विवादांचे चक्रव्यूह आणि त्यातूनही मार्ग काढत आपलं कर्तव्य निभावणारे मोदी अशा अनेक घटना पाहायला मिळत आहेत. या चित्रपटात विवेक ओबेरॉयसह बोमन इराणी, इरीना बहाव, बरखा बिष्ट, मनोज जोशी, प्रशांत नारायणन यांसारखे कलाकार पाहायला मिळणार आहेत.

Leave a Comment