हे आहे जगातील सर्वात महागडे आणि स्वस्त शहर

city
मुंबई : पॅरिस, सिंगापूर आणि हाँगकाँग हे जगातील सर्वात महागडे शहर असल्याचे इकोनॉमिस्ट इंटेलिजेंस युनिटच्या २०१९ मधील कॉस्ट ऑफ लिविंग सर्वेक्षणात समोर आले आहे. तर स्वस्त शहरांध्ये भारतातील दिल्ली, चेन्नई आणि बंगळुरु या शहरांचा समावेश आहे. वर्षभरात ‘सीएनएन’ने केलेल्या या सर्वेक्षणात पॅरिस, सिंगापूर आणि हाँगकाँग हे राहण्यासाठी सर्वात महागडे शहर असल्याचे म्हटले आहे.

१३३ शहरांमधील १५० वस्तूंचे मुल्यांकन या सर्वेक्षणात तपासले गेले. या यादीत स्विट्झरलँडमधील ज्यूरिख हे शहर चौथ्या स्थानावर तर जेनेव्हा आणि जपान मधील ओसाका शहर पाचव्या स्थानावर आहे. सातव्या स्थानावर दक्षिण कोरियातील सिओल, डेनमार्कमधील कोपेनहेगन आणि अमेरिकेतील न्यूयॉर्क आहे. अमेरिकेतील लॉस एंजिलस आणि इस्राईलमधील तेल अवीव हे शहर सगळ्यात महागड्या शहरांमध्ये 10 व्या स्थानावर आहे.

कराकस (व्हेनेजुएला), दमिश्क (सिरिया), ताशकंद (उज्बेकिस्तान), अलमाटी (कजाकिस्तान), कराची (पाकिस्तान), लागोस (नायजेरिया), ब्यूनस आयर्स (अर्जेंटीना) आणि भारतातील बंगळुरू, चेन्नई आणि दिल्ली या शहरांचा जगातील सर्वात स्वस्त शहरांमध्ये समावेश आहे.

Leave a Comment