या कारणामुळे पंकजा मुंडेंनी हटवला आपल्या नावासमोरून ‘चौकीदार’

pankaja-munde
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मैं भी चौकीदार’ या मोहिमेची देशात मोठी चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी या मोहिमेचाच एक भाग म्हणून आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या नावासमोर ‘चौकीदार’ असा शब्द जोडल्याचे पाहायला मिळत आहे.

पण राज्यातील भाजप सरकारमधील महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांच्या नावापुढे मात्र सोशल मीडियावर ‘चौकीदार’ हा शब्द लावलेला दिसत नाही. याबाबत त्यांना एका कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला असता, तेव्हा त्यांनी मी देखील माझ्या नावापुढे चौकीदार हा शब्द जोडला होता. पण त्यानंतर मी ट्रोल होऊ लागल्याने चौकीदार हा शब्द काढून टाकला. सोशल मीडियावर मी काय करत असते हे पाहण्यासाठी काही लोक टपून बसलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मैं भी चौकीदार’ या मोहिमेला माझ्यामुळे गालबोट लागू नये, यासाठी माझ्या नावापुढील चौकीदार हा शब्द मी वगळल्याचे स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिले आहे.

Leave a Comment