नोटबुकमधील भाईजानच्या आवाजातील ‘ते’ गाणे रिलीज

salman-khan
नुकतेच सलमान खानची निर्मिती असलेल्या ‘नोटबुक’ चित्रपटातील ‘मै तारे’ हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. हे गाणे खुद्द सलमान खाननेच गायले आहे. सलमान खानने या गाण्याचा टीजर काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर शेअर कला होता.

प्रनुतन बहल आणि जहिर इकबाल या नवोदित कलाकारांना घेऊन सलमान खान ‘नोटबुक’ चित्रपटाची निर्मिती करत आहे. त्याने या चित्रपटाच्या ‘मै तारे’ या गाण्यासाठी आवाज दिला आहे. त्याने यापूर्वीही ‘हँगओव्हर’, ‘मै हु हिरो तेरा’ ही गाणी गायली आहेत. त्याने आता ‘मै तारे’ या गाण्यातूनही त्याच्या आवाजाची झलक दाखवून दिली आहे. तर विशाल मिश्रा यांनी हे गाणे कंपोझ केले आहे. प्रनुतन बहल आणि जहिर इकबाल यांच्या रोमॅन्टिक केमेस्ट्रीसह सलमान खानच्या अभिनयाची झलक या गाण्यात पाहायला मिळते. हा चित्रपट २९ मार्चला प्रदर्शित होईल.

Leave a Comment