ऑस्ट्रेलियन संघात स्मिथ-वॉर्नरची वापसी

australia
दुबई – बॉल टेम्परिंग प्रकरणी दोषी आढलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेविड वॉर्नर यांचे संघात पुनरागमन झाले आहे. ऑस्ट्रेलियन संघ सध्या पाकिस्तानविरूद्ध एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी दुबईत असल्यामुळे या दोघांना ऑस्ट्रेलियन संघाने दुबईत बोलवत एक कार्यक्रम ठेवला होता. स्मिथ आणि वॉर्नरचे या कार्यक्रमात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी प्रेमाने आलिंगन देत जोरदार स्वागत केले. ऑस्ट्रेलियाने केलेले हे अनोखे स्वागत पाहून स्मिथ आणि वॉर्नर भावूक झाले होते.

आमचे संघाने केलेले स्वागत हे भारावून टाकणारे होते. आमेचे सहकाऱ्यांनी केलेले स्वागत पाहून आम्हाला वाटत आहे की, या संघातून आम्ही कधी बाहेर गेलोच नव्हतो, अशा भावना यावेळी दोन्ही खेळाडूंनी व्यक्त केल्या. आमचा संघ भारताविरुद्ध मोठा विजय मिळवल्यानंतर आता पाकिस्तानविरुद्ध शानदार कामगिरी करेल, असा विश्वास माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने यावेळी व्यक्त केला आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात २२ मार्च ते ३१ मार्च या काळात ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका दुबई येथे खेळण्यात येणार आहे. मार्च २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन येथे खेळण्यात आलेल्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी बंदी झेलत असलेल्या या दोन्ही खेळाडूंवरील १ वर्षासाठीची बंदी २९ मार्चला संपणार आहे.

Leave a Comment