तुम्ही पाहिले आहे का ‘कलंक’चे पहिले वहिले गाणे

kalank
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या अंतर्गत बनत असलेल्या ‘कलंक’ या चित्रपटाची बी-टाऊनमध्ये बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा टीजर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. चित्रपटातील सर्व कलाकारांची दमदार झलक या टीजरमध्ये पाहायला मिळाली. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज करण्यात येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटातील पहिले वहिले गाणे ‘घर मोहे परदेसीया’ हे रिलीज करण्यात आले आहे. आलिया भट्ट आणि माधुरी दिक्षीत यांची अप्रतिम जुगलबंदी श्रेया घोषाल आणि वैशाली भैसने-माडे यांच्या दमदार आवाजातील गाण्यावर पाहायला मिळते.

या गाण्यात वरूण धवन याचीही खास झलक पाहायला मिळते. आलियाच्या अभिनयाप्रमाणेच तिचे कथ्थक नृत्यही प्रेक्षकांवर भूरळ पाडत आहे. या गाण्यात माधुरी दीक्षितचेही दमदार नृत्य पाहायला मिळते. त्यामुळे या दोघींचीही जुगलबंदी असलेले हे गाणे सोशल मीडियावर हिट होत आहे. वरूण धवन, सिद्घार्थ रॉय कपूर, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्ट, संजय दत्त हे सर्व ‘कलंक’ या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाची कथा अद्याप गुलदस्त्यात असली तरी, प्रेक्षकांना ट्रेलरची उत्कंठा आहे. हा चित्रपट १७ एप्रिलला रिलीज करण्यात येणार आहे.

Leave a Comment