तुमच्या मोबाईलमधील ‘हे’ अॅप्स ताबडतोब डिलीट करा

mobile
तुमच्या मोबाईलमध्ये जर तुम्ही अॅन्टीव्हायरस अॅप डाऊनलोड करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुम्ही नक्कीच वाचा. कारण अॅन्टीव्हायरस अॅपमुळे आपला मोबाईल सुरक्षित रहातो अशी आपल्यापैकी बहुतेक जणांची धारणा आहे. पण हे चुकी आहे. मोबाईलमध्ये अॅन्टीव्हायरस अॅपचा काही देखील उपयोग नाही. या अॅपमुळे तुमच्या स्टोरेजमधील जागा मात्र अडवली जाते, असा खुलासा एका अहवालात ऑस्ट्रियाची अॅन्टीव्हायरस कंपनी एव्ही कंपेरेटिव्सने केला आहे.

या कंपनीच्या अहवालात असे सांगण्यात आले आहे, की असे भरपूर अॅन्टीव्हायरस मोबाईल अॅप आहेत ज्यांचा काडीमात्र उपयोग होत नाही. कंपनीच्या अहवालानुसार गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध असलेले काही अॅन्टी व्हायरस काहीच कामाचे नाहीत. २५० अॅन्टीव्हायरस मोबाईल अॅपचा या अहवालासाठी सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणाच्या दरम्यान २५० अॅपमधून ८० अॅपनी मालवेअर डिटेक्टिंग टेस्ट पास केली. या ८० अॅप्समधून २३ अॅप्स असे होते ज्यांनी मालवेअरला १०० टक्के डिटेक्ट केले.

या सर्वेक्षणामध्ये मेकॅफी, अवास्ता, चिता मोबाईल्स, एव्हीजी, डीयू टेस्टर, बिटडिफेंडर आणि गुगल प्ले प्रोटेक्ट सारख्या अॅप्सचा समावेश आहे. सर्वेक्षणा दरम्यान हे अॅप फोनमध्ये इन्स्टॉल करण्यात आले आणि मग व्हायरस असलेले अॅप इन्स्टॉल करण्यात आले. यापैकी काही अॅप असे आहेत ज्यांनी व्हायरस असणारे अॅप ब्लॉक केले. उल्लेखनीय म्हणजे प्ले-स्टोरवर या सर्व अॅपला सर्वोच्च रेटिंग देण्यात आली आहे.

Leave a Comment