अक्षय, सैफ पाठोपाठ शाहरुखही ‘डिजिटल डेब्यू’ करण्याची शक्यता.

shahrukh-khan
अलीकडच्या काळामध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मची लोकप्रियता वाढली असून, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम सारख्या माध्यमांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच पसंती मिळत आहे. त्यामुळे या डिजिटल माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या चित्रपट किंवा मालिकांमध्ये आता बॉलीवूडमधील ‘ए-लिस्ट’ कलाकारही पहावयास मिळत आहेत. अक्षय कुमार आणि सैफ अली यांनी नेटफ्लिक्सच्या माध्यमातून डिजिटल डेब्यू अगोदरच केला असून, आता त्याच्या पाठोपाठ बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान डिजिटल विश्वात पदार्पण करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचवेळी अभिनेता हृतिक रोशन देखील लवकरच ‘डिजिटल डेब्यू’ करणार असल्याचे म्हटले जात आहे.
shahrukh-khan1
शाहरुख खान लवकरच एका थरारक वेब सिरीजमध्ये दिसण्याची शक्यता असून, ही वेबसिरीज नेटफ्लिक्सवर प्रसारित करण्यात येणार असल्याचे समजते. ‘स्पॉट बॉय’ नामक वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार या वेबसिरीजचे कथानक शाहरुख खानला आवडले असून, शाहरुखच्या ‘रेड चिलीज एन्टरटेनमेंट’ या प्रोडक्शन हाऊसच्या वतीने या वेबसिरीजची निर्मिती केली जाणार आहे. या वेब सिरीजमध्ये इम्रान हाश्मी देखील भूमिका साकारणार असून, या वेब सिरीजचे कथानक बिलाल सिद्दिकी यांच्या पुस्तकावर आधारित असल्याचे समजते.
shahrukh-khan2
अलीकडच्या काळामध्ये बॉलीवूड कलाकार चित्रपटांच्या सोबतीने वेबसिरीजमध्ये अभिनय करण्याला ही पसंती देऊ लागले असून, सैफ अली खान अभिनीत ‘द सेक्रेड गेम्स’ ही वेबसिरीज खूप लोकप्रिय ठरली होती. बॉलीवूडमध्ये अभिनयाची फारशी संधी न मिळालेले कलाकारही वेबसिरीजच्या माध्यमातून उत्तम कामगिरी करीत आहेत. अलीकडेच सुरु झालेल्या अक्षय कुमार अभिनीत ‘द एंड’ नामक वेबसिरीजमध्ये अक्षय धाडसी स्टंट करताना दिसणार आहे.

Leave a Comment