केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांचे प्रियंका गांधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य

mahesh-sharma
बुलंदशहर – उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरच्या सिकंदराबाद येथे झालेल्या सभेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी असे काही वक्तव्य केले जे भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत जड जाऊ शकते. प्रियंका गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करण्यापूर्वी महेश शर्मा यांनी अलीकडेच देवांना देखील मूर्ख असल्याची उपमा दिली होती.

सिकंदराबाद येथील सभेला संबोधित करताना गौतम बुद्ध नगरचे खासदार महेश शर्मा यांनी कॉंग्रेसवर हल्ला केला. दरम्यान, त्यांनी सांगितले की ममता बॅनर्जींनी येथे येऊन कथक केले आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी गाणे गायले तर त्यांचे ऐकणार कोण आहे? त्याचबरोबर ते एवढ्यावरच थांबले नाहीत ते पुढे म्हणाले, पप्पु म्हणतो मी पंतप्रधान बनणार, आता तर पप्पूची पप्पी (प्रियंका गांधी) देखील आली आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आपला सिंह मोदी आहे.

Leave a Comment