‘नोटबुक’साठी सलमान खानने गायले गाणे

salman-khan
अनेक नव्या चेहऱ्यांना बॉलीवूडमध्ये प्रवेश देण्यासाठी बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खान प्रसिद्ध आहे. त्याची निर्मिती असलेल्या ‘नोटबुक’ या चित्रपटातून प्रनूतन बहल आणि जहिर इक्बाल हे बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता यातील एक खास गाणे तुमच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटातील हे गाणे अधिक खास असणार आहे. कारण हे गाणे सलमान खानने गायले असल्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी हे गाणे एक पर्वणीच असणार आहे. यात काही शंकाच नाही. ‘मैं तारे’ असे या गाण्याचे बोल असून ट्विटरवर या गाण्याचा टीझर शेअर करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे.


सलमानने याआधी देखील २०१५मध्ये आलेल्या ‘हिरो’ चित्रपटातील ‘मैं हूँ हिरो तेरा’ हे गाणे गायले होते. त्याचबरोबर ‘किक’ चित्रपटातील ‘हँग ओव्हर’ हे गाणे देखील त्याने गायले होते. प्रेक्षकांची या दोन्ही गाण्यांना चांगलीच पसंती मिळाली होती. त्यामुळे आता हे गाणेही भाईजनाच्या चाहत्यांच्या पसंतीस नक्कीच उतरेल.

Leave a Comment