न्यूझीलंडमधील मशीदवरील हल्लेखोर म्हणतो; भारतीयांना पिटाळून लावले पाहिजे

terrorist
वेलिंग्टन: न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च शहरातील मशिदीत काल सकाळच्या दरम्यान अंधाधुंद गोळीबार करून ४९ जणांचे बळी घेणाऱ्या हल्लेखोराने त्याने केलेल्या कृतीमागील कारण स्पष्ट केले आहे. या हल्लेखोराचे नाव ओल्ड ब्रेन्टन असे असून न्यूझीलंडच्या भूमीवरून भारत आणि पूर्वेकडच्या देशांतील लोकांचे उच्चाटन केले पाहिजे, असे त्याने म्हटले आहे.

पोलिसांना हल्ल्यानंतरच्या तपासादरम्यान ऑनलाईन आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेला ओल्ड ब्रॅन्टनचा ७४ पानी जाहीरनामा मिळाला. ब्रेन्टनने द ग्रेट रिप्लेसमेंट असे शीर्षक असणाऱ्या या जाहीरनाम्यात युरोपच्या भूमीवरून सर्व घुसखोरांना पिटाळून लावले पाहिजे, असे म्हटले आहे. मग ते रोमा, भारतीय, सेमिटीक किंवा तुर्कीश वंशाचे लोक असोत. ते आपले लोक नसतील तर त्यांना आपल्या भूमीवरून हाकललेच पाहिजे, असे या जाहीरनाम्यात ब्रॅन्टनने म्हटले आहे. हा जाहीरनामा ब्रेन्टनने क्लाऊड, सोशल मीडिया आणि काही ऑनलाईन माध्यमांवर प्रकाशित केला होता.

जाहीरनाम्यात ब्रॅन्टनने म्हटल्याप्रमाणे न्यूझीलंडमध्ये हल्ला करण्याचा माझा विचार नव्हता. फक्त काही काळ मी येथे राहण्यासाठी आलो होतो. पण माझ्या लक्षात या काळात एक गोष्ट आली की, न्यूझीलंड हे पश्चिमेकडील कोणत्याही देशाच्या तुलनेत हल्ल्यासाठी योग्य ठिकाण असल्यामुळे येथील नागरी संस्कृतीवर होणाऱ्या अतिक्रमणाकडे इतरांचे लक्ष वेधले जाईल, ब्रॅन्टनने म्हटले आहे.

शुक्रवारी अल नूर आणि लिनवुड अवे या दोन मशिदींमध्ये टॅरॅन्टने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ४९ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. दोन भारतीय देखील या हल्ल्यात जखमी झाले असून नऊ जण बेपत्ता आहेत. बांगलादेशचा क्रिकेट संघही या हल्ल्यातून थोडक्यात बचावला होता. त्याने अंधाधुंद गोळीबार प्रार्थनेसाठी मशिदीत गर्दी जमली असताना केल्यामुळे मोठ्याप्रमाणावर जीवितहानी झाली. या घटनेचा निषेध करताना न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिगा आर्डर्न यांनी ओल्ड ब्रॅन्टन हा दहशतवादी असल्याचा उल्लेख केला. पोलिसांनी या हल्ल्यानंतर टॅरॅन्टला ताब्यात घेतले होते. आज त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर ५ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.

Leave a Comment