आई-बाबा झाले रणवीर-दीपिका !

deep-veer
गेल्या वर्षी १५ नोव्हेंबर रोजी सिंधी पद्धतीने इटलीच्या लेक कोमा नयनरम्य ठिकाणी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत बॉलीवडूची मस्तानी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे विवाहबद्ध झाले. लग्नानंतर ही जोडी कायम या ना त्या कारणासाठी चर्चेत येत आहे. ही जोडी सध्या लंडनच्या दौऱ्यावर असून त्यांनी या टूरदरम्यान एका सेलिब्रिटीला दत्तक घेतल्याचे समोर आले आहे. सध्या सोशल मीडियावर दीपिका-रणवीर आणि त्यांच्या दत्तक सेलिब्रिटीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.


अभिनेता वरुण धवनला दीपिका-रणवीर या जोडीने दत्तक घेतले असून सोशल मीडियावर या तिघांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. वरुणने या व्हिडिओमध्ये मजेशीर अंदाजात दीपिका-रणवीरला त्याचे दत्तक पालक असे संबोधले आहे. त्यासोबतच त्याने या व्हिडिओमध्ये दीपिका आपली किती काळजी घेते हेदेखील सांगितले आहे. दरम्यान, दीपिका-रणवीर सध्या लंडनला फिरायला गेले आहेत. तर वरुण त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण करण्यासाठी गेला आहे. यादरम्यान हे तिघे एकमेकांना भेटले असून त्यांनी मजेमध्ये हा व्हिडिओ तयार केला आहे.

Leave a Comment