राजामौलींच्या चित्रपटात झळकणार बाजीराव सिंघम

ajay-devgan
एस. एस. राजामौलींच्या ‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि त्यानंतर ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या चित्रपटांनी दोन वर्षांपूर्वी जगभरात धुमाकुळ घातला होता. त्यानंतर आता राजामौलींचा ‘आरआरआर’ हा चित्रपट येत आहे. या चित्रपटात कोणती स्टारकास्ट असेल यांची उत्सुकता चाहत्यांना होती.

राजामौली यांनी हैद्राबाद येथे चित्रपट संदर्भात काही महत्वाच्या घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. टॉलिवूड सुपरस्टार राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर देखील या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. या दरम्यान राजामौलींनी चित्रपटामध्ये राम चरण, ज्युनिअर एनटीआर आणि अभिनेत्री आलिया भट्टसह अभिनेता अजय देवगनही झळकणार असल्याची घोषणा केली.

अभिनेता राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर ‘आरआरआर’ चित्रपटात स्वातंत्र सैनिकांची भुमिका साकारणार असून आलिया भट्ट आणि अजय देवगन सहाय्यक कलाकार असणार आहेत. चित्रपटात महत्वाची भुमिका साकारण्यास अजय देवगनने होकार दिला आहे. या चित्रपटाचा भाग होण्यासाठी तो खूप उत्साहित असल्याचे राजामौली यांनी ट्विट केले आहे. राजामौलींसोबत काम करणे म्हणजे माझ्या बकेट लिस्टमधील एक इच्छापूर्ण होण्यासारखे आहे. त्याच बरोबर राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर सहसुद्धा. मी दक्षिणात्य चित्रपटात पहिल्यांदा काम करणार असून मी त्यासाठी फार उत्साही असल्याचे आलिया भट्टने ट्विट केले आहे. आरआरआर हा चित्रपट तेलगू, तमिळ, हिंदी, मल्याळम आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये 2020च्या 30 जुलैला रिलीज होणार आहे.

Leave a Comment