देहविक्रयाच्या अड्ड्यावर ज्या पोलिस अधिकाऱ्याने मारला, त्यात त्याचीच पत्नी निघाली कॉलगर्ल

police
लंडन – इंग्लंडमधील एका पत्रकाराने हायप्रोफाईल आणि तेथील हॉटेलमध्ये सुरु असणाऱ्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. त्यादरम्यान अनेक महिलांना अटक करण्यात आली. त्यात एक महिला विशेष होती. अटक करण्यात आलेल्या महिलांमध्ये एका पोलिस खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नीचा देखील समावेश होता. त्याची 30 वर्षीय पत्नी गेल्या 10 वर्षांपासून कॉलगर्ल म्हणून हे काम करत होती. पण तिच्या या रासलीलांचा पतीला थांगपत्ता देखील नव्हता. स्टिंग ऑपरेशनमध्ये खुलासा झाला नसता तर तिचे सत्य कधीच पती आणि जगासमोर आले नसते.

स्टिंग ऑपरेशनमध्ये लंडनच्या पोलिस विभागात मोठ्या पदावर असलेल्या एका अधिकाऱ्याची पत्नी देहविक्रय करताना पकडली गेली. तिला पोलिसांनी ताब्यात घेऊन नाव आणि कुटुंबाची माहिती घेतली. तेव्हा ती आपल्याच विभागातील बड्या अधिकाऱ्याची पत्नी असल्याचे त्यांना कळाले. आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्याची पत्नी पोलिस स्टेशनला अटक करून आणली आणि तिच्यावर देहविक्रयाचे आरोपही लागले. पण, आपल्या वरिष्ठाला आणि तिच्या पतीला ही गोष्ट सांगावी तरी कशी असा प्रश्न त्यांना पडला होता. कॉलगर्ल होण्याचे कारण तिला विचारले तेव्हा दुसरा धक्का बसला. पैसे कमविण्यासाठी आपण हे काम करत नाही, तर केवळ मौज मजेसाठी करत आहोत अशी कबुली तिने दिली. त्याचबरोबर आपल्या कामाबद्दल पश्चाताप नसल्याचेही तिने म्हटले आहे.

जेव्हा पोलिसांनी हीच माहिती तिच्या पतीला दिली तेव्हा पतीच्या पायाखालची वाळूच सरकली. ज्या सुंदर आणि सुशील महिलेसोबत आपण पती म्हणून राहत आहोत, तिची प्रत्येक मागणी पूर्ण करत आहोत, ती चक्क कॉलगर्ल निघेल याचा त्याने विचारही केला नव्हता. आपल्या पत्नीला सोडण्याचा निर्णय पीडित पतीने घेतला. तसेच आपल्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पत्नीच्या विरोधात अधिकृत तक्रार दाखल केली. सोबतच, पोलिसांना तिच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे.

Leave a Comment