हा दाक्षिणात्य सुपरस्टार एका चित्रपटासाठी घेतो तब्बल 18 कोटी रुपये मानधन

allu-arjun
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन याने नुकताच आपल्या लग्नाचा 8वा वाढदिवस साजरा केला. तो 2011साली स्नेहा रेड्डी हिच्याशी विवाहबद्ध झाला. स्नेहा हिच्याशी अल्लूची भेट त्याच्या मित्रांनी एका लग्ना दरम्यान करुन दिली होती. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अल्लू अर्जून रोमॅन्टिक हिरो म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर तो त्याच्या आलिशान राहणीमान आणि त्याच्या आलिशान गाड्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याने मागील वर्षात 65 हजारांचा एक टीशर्ट आणि 1.50 लाख रुपयांचे शू घातले होते. त्यातच अल्लू एका चित्रपटासाठी 16 ते 18 कोटी रुपये घेतो. सध्या तो आपल्या 100 कोटींच्या बंगल्यात राहतो.
allu-arjun1
अनेक आलिशान गाड्यांचा अल्लू अर्जुन मालक आहे. यांची किंमत जवळपास 4-5 कोटी आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये रेंज रोवर, ऑडी आणि BMW सीरिजच्या महागड्या कार आहेत. अल्लूजवळ BMW X6 Coupe कार आहे, ज्याचा नंबर 666 आहे. यासोबतच त्याच्याजवळ जगुआर आणि पोर्शे आहे.
allu-arjun2
आपल्या संपत्तीमुळे अल्लू अर्जुन फोर्ब्सच्या टॉप 100 सेलिब्रिटी लिस्टमध्ये आला होता. 2015 मध्ये टॉप 50 मध्येही त्याचे नाव आले होते. अभिनेता चिरंजीवीचा अल्लु नातेवाईक असल्याचे फार कमी लोकांना माहिती आहे. त्याचे वडील निर्माता अल्लू अरविंदसोबत चिरंजीवीची बहीण निर्मलाचे लग्न झाले आहे. अल्लू आताच चित्रपटात आला नसून त्याने याआधी बालकलाकार म्हणूनही केले आहे. तो 2 वर्षांचा असताना त्याने तेलुगु चित्रपट ‘विजेता’ मध्ये काम केले होते.
allu-arjun3
फेसबुकवर दीड कोटींहून अधिक फॉलोअर्स असणारा अल्लु अर्जुन साऊथचा एकमेव सुपरस्टार आहे. याशिवाय ट्विटरसुद्धा त्याचे जवळपास 2 मिलियन फॉलोअर्स आहेत. 2016 मध्ये अर्जुनने 800 ज्युबली नावाने नाईट क्लब सुरू करून नव्या बिझनेसमध्ये प्रवेश केला. 2003 मध्ये पहिल्यांदा अल्लु हा लीड रोलमध्ये तेलुगु चित्रपट ‘गंगोत्री’मध्ये दिसला होता. हा चित्रपट खुपच गाजला आणि आणि अल्लु अर्जून स्टार झाला.

Leave a Comment