जॉन सीना म्हणतो आहे; ‘अपना टाइम आयेगा’

john-snea
बॉक्स ऑफिसवर झोया अख्तर दिग्दर्शित आणि रणवीर सिंह-आलिया भट्ट अभिनित गली बॉय चित्रपटाने भरघोस कमाई केली हे तर तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही. काही दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्रामवर हॉलिवूड स्टार विल स्मिथने चित्रपटाचे कौतुक करत त्यातील एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यानंतर आता रेसलर जॉन सीनानेही आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटचे प्रोफाईल ‘अपना टाइम आयेगा’ने सजवले आहे.

त्याने आपल्या अकाऊंटवर असे लिहिले आहे, इन्स्टाग्रामवर तुमचे स्वागत. या इमेजीस काहीही न सांगता मी पोस्ट करत आहे, एंजॉय. त्याचबरोबर त्याने या फोटोला काहीच कॅप्शन दिलेली नाही. सीनाने हा असला प्रकार पहिल्यांदाच केलेले नाही. त्याने याआधीही भारतीय कलाकारांचे फोटो शेअर केले आहेत. त्यात शाहरुख खान, दलेर मेहंदी, कपिल शर्मा आणि भारतीय क्रिकेट टीमचा समावेश होता. त्याने काही दिवसांपूर्वीच शाहरुख खानचा फोटो शेअर केला. त्यावर त्याने स्वप्न पाहणे पुरेसे नसते, त्यासाठी काही जुन्या गोष्टी सोडून द्यावा लागतात, असे लिहिले होते.

Leave a Comment