नीता अंबानींनी चक्क मराठीत साधला विद्यार्थ्यांशी संवाद

neeta-mabani
मुंबई – नुकतेच मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथील धीरूभाई अंबानी स्क्वेअरचे उद्घाटन नीता अंबानी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नीता अंबानी यांनी विद्यार्थ्यांशी चक्क मराठीतून संवाद साधला. सध्या सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या कार्यक्रमांमध्ये दोन हजार वंचित मुलांनी सहभाग नोंदवला होता. ‘वंदेमातरम’ आणि ‘जय हो’ ही गाणी यावेळी मुलांनी म्हटली.

याप्रसंगी बोलताना नीता अंबानी यांनी मुंबई एक मायानगरी असून येथे कोणीही छोटे किंवा मोठे नाही. मुंबईत लोक आपल्या कष्टाने आपले नशीब बदलतात. एका साधारण कुटुंबातून माझे सासरे धीरूबाई अंबानी आले होते. त्यांचे वडिल पेश्याने शिक्षक होते. मी येथे जमलेल्या सर्व मुलांना विचारते की, तुम्ही मोठे होऊन आपल्या देशाला अजून सुंदर बनवणार का? विद्यार्थ्यांनी नीता अंबानी यांच्या या प्रश्नाचे एका सुरात हो असे उत्तर दिले. तुमच्याही मनात धीरूभाई सारखे उद्योगपती, लता मंगेशकरांसारख्या गायिका आणि सचिन तेंडुलकरसारखा क्रिकेटपटू होण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना विचारला. त्यावेळी विद्यार्थ्यांनी या सर्व प्रश्नावर सकारात्मक उत्तरे दिली.

आपल्याला सचिन तेंडुलकर , लता मंगेशकर आणि धीरूभाई अंबानी यासारख्या मोठ्या लोकांनी मेहनत करायला तर शिकवलेच, शिवाय माणूस हा जन्माने नाही तर त्याच्या कर्माने मोठा होतो हे देखील दाखवून दिले आहे. तुम्हीही या दिग्गजांप्रमाणे देशाचे नाव मोठे करा असा सल्ला नीता अंबानी यांनी विद्यार्थांना दिला.

Leave a Comment