काँग्रेसच्या तिकीटावर ‘या’ मतदार संघातून निवडणूक लढवणार हार्दिक पटेल!

hardik-patel
अहमदाबाद – गुजरातमध्ये पाटीदार समाजासाठी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केलेले पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर हार्दिक पटेल हे गुजरातमधील जामनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचीही शक्यता वर्तवण्यात आहे. याबाबत इतर प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, १२ मार्च रोजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हार्दिक पटेल हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

भाजपच्या पूनमबेन मादम या सध्या जामनगर मतदारसंघाच्या खासदार आहेत. अहमदाबाद येथे काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पटेल पक्षात सहभागी होण्याची शक्यत आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीनंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते त्याठिकाणी एक जाहीर सभा घेतील. काँग्रेसने आपले संपूर्ण लक्ष मोदींचा गड असलेल्या गुजरातवर केंद्रीत केले आहे. सत्तारूढ भाजपला त्यांनी मागील विधानसभा निवडणुकीत कडवी टक्कर दिली होती.

Leave a Comment