पवारांसोबतच्या चर्चेनंतर मनसेची लोकसभा निवडणुकीतून माघार!

mns
मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना समाविष्ट होणार की नाही हे कोडे अद्याप उलगडलेले नसतानाच शरद पवारांसोबत राज ठाकरेंची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून मनसे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भातील वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

केवळ महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लढवण्यात मनसेला रस आहे. मनसे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण असे असले तरी सरकार पाडण्यात मनसे मदत करणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील सभेत मोदी आणि युतीच्या सरकारविरोधात येतील त्यांना सोबत घेण्यास हिरवा कंदिल दाखवला होता. पण मनसेच्या आघाडीप्रवेशाला महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या विरोधी भूमिकेमुळे खीळ बसू शकते.

Leave a Comment