विद्युत जामवालच्या आगामी ‘जंगली’चा ट्रेलर रिलीज

junglee
नुकताच अभिनेता विद्युत जामवालच्या बहुचर्चित जंगली चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा ट्रेलर चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

चित्रपटातील पात्रांची ओळख २.४७ मिनीटांच्या या ट्रेलरच्या सुरुवातीला करुन देण्यात येत आहे. विद्युतने या चित्रपटात एका पशुचिकित्सकाची भूमिका वठवली असून त्याच्या मित्राचे म्हणजे हत्तीचे नाव ‘भोला’ असल्याचे पाहायला मिळत आहे. विद्युतव्यतिरिक्त या चित्रपटामध्ये अतुल कुलकर्णी आणि अभिनेत्री पूजा सावंत हे दोन मराठी कलाकारही झळकले आहे. या चित्रपटात पुजा सावंतने ‘शंकरा’ ही व्यक्तिरेखा साकारली आहे, तर हत्तींची शिकार करणाऱ्या शिकारीची भूमिका अतुल यांनी साकारली आहे. ‘जंगली पिक्चर्स’ची निर्मिती असलेला हा चित्रपट दिग्दर्शक चक रसेल यांनी दिग्दर्शित केला असून या चित्रपटाचे विनीत जैन निर्माते आहेत, तर सहनिर्मात्या म्हणून प्रीती शहानी या चित्रपटाशी जोडल्या गेल्या आहेत.

Leave a Comment