अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणार कंगना

kangana-ranavat
बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना राणावत ही तिचा यंदाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करणार आहे. आपल्या परखड मतांसाठी प्रसिद्ध असलेली कंगना चक्क दहा दिवस शांत राहणार म्हणजेच ती मौनव्रत पाळणार आहे.

कंगना दहा दिवस कोइंबतूर येथील एका आश्रमामध्ये योग आणि ध्यानधारणा करणार असल्याचे वृत्त आहे. येत्या 23 तारखेला तिचा वाढदिवस आहे. दहा दिवसाच्या ध्यानधारणेनंतर ती आपल्या घरी म्हणजेच मनालीला जाणार आहे. ती मनालीत कुटुंबीयांसोबत तिचा वाढदिवस साजरा करणार आहे. कंगनाने गेल्या वर्षीसुद्धा तिचा वाढदिवस कुटुंबीयांसोबत वेळ घालवत साजरा केला होता. तिने ३१वा वाढदिवस म्हणून ३१ झाडेसुद्धा लावली होती.

‘मुंबई मिरर’ला याबाबत दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली, १६-१७ वर्षांची असल्यापासून मी योगसाधना करते. जो कोर्स कोइंबतूरमध्ये होणार आहे ती थोडी पुढची पायरी आहे. माझी तो कोर्स करण्याची खूप इच्छा होती आणि नेमके माझ्या वाढदिवसाच्या तारखांमध्ये ते जुळून आले. दहा दिवस मौन पाळणे माझ्यासाठी आव्हानात्मक असेल. पण ही मी स्वत:ला वाढदिवशी दिलेली अमूल्य भेट असेल.

Leave a Comment