राजस्थानातील विद्यार्थ्यांना शिकवली जाणार विंग कमांडर अभिनंदन यांची शौर्यकथा

abhinandan
जयपूर – पाकिस्तानच्या एफ-16 विमानाला आस्मान दाखविणारे भारताचे वीरपुत्र विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे देशभरात त्यांच्या पराक्रमाचे कौतूक होत आहे. त्यातच आता शालेय विद्यार्थ्यांना देखील त्यांची शौर्यकथा आता पुस्तकाच्या माध्यमातून वाचता येणार असून राजस्थान सरकारने राज्यातील शालेय पाठ्यपुस्तकात अभिनंदन वर्धमान यांची शौर्यकथेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला असून याबद्दलची माहिती राजस्थानचे शिक्षणमंत्री गोविंदसिंह दोतसरा यांनी दिली आहे.

राजस्थान सरकारने हा निर्णय अभिनंदन यांचा सन्मान करण्यासाठी घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी याची माहिती आपल्या फेसबुक पोस्टद्वारेही दिली आहे. त्यांनी यासाठी अभिनंदनदिवस असा हॅशटॅगही वापरला आहे. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे मिग २१ विमान भारतीय हवाई हद्दीत बेकायदा घुसलेल्या पाकिस्तानच्या एफ-१६ विमानांना पळवून लावताना पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळल्यानंतर अभिनंदन पाकिस्तानी सैन्याच्या तावडीत सापडल्यानंतर त्यांनी तब्बल ६० तास पाकिस्तानच्या ताब्यात घालवले. त्यानंतर ते तीन दिवसांपूर्वी भारतात होते. ही घोषणा दोतसरा यांनी केली असली तरी कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांना हा धडा नेमका शिकवण्यात येणार आहे, याचे स्पष्टीकरण त्यांनी दिलेले नाही. त्याचबरोबर या धड्यामध्ये पुलवामातील शहीदांच्या कथांचाही समावेश केला जाणार आहे.

Leave a Comment