व्हिडीओ ; रणबीर घेत आहे दीपिकाकडून घर रंगवण्याचा सल्ला

deepika-padukone
‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटानंतर रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण ही जोडी पुन्हा एकत्र झळकलीच नाही. पण आता ही जोडी तीन वर्षांनंतर एका जाहिरातीच्या निमित्ताने एकत्र आली आहे. सध्या सोशल मीडियावर या जाहिरातीचा व्हिडिओ जोरदार चर्चेत आहे.

रणबीर-दीपिकाने ‘एशियन पेंट्स’च्या जाहिरातीत एकत्र काम केले आहे. रणबीर-दीपिकाच्या मैत्रीला या जाहिरातीत अधोरेखित करण्यात आले आहे. दीपिकाच्या फॅन क्लबने काही दिवसांपूर्वी शूटिंगदरम्यानचा एक फोटो शेअर केला होता. दोघेही त्यात निवांत कॉफी पिताना दिसले. जाहिरातीच्या शेवटी हेच दृश्य पाहायला मिळत आहे. दीपिकाला घराला कोणता रंग द्यावा याबाबत संभ्रमात असलेला रणबीर कॉल करतो. दोघांचा फोनवरील गमतीशीर संवाद आणि त्यानंतर दोघांची ऑनस्क्रीन मैत्री या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

Leave a Comment