मिलिंद एकबोटे धर्मवीर संभाजी पुरस्काराने करणार विंग कमांडर अभिनंदन यांचा सन्मान

milind-ekbote
शनिशिंगणापूर – समस्त हिंदु आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी शनिशिंगणापूर येथे हिंदू एकताच्या वतीने भारतीय हवाई दलातील विंगकमांडर अभिनंदन वर्धमान यांना धर्मवीर संभाजी महाराज मृत्युंजय पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यांना हा पुरस्कार ५ एप्रिल रोजी होणाऱ्या सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.

एकबोटे यांनी शनीशिंगणापूर येथे महाशिवरात्री निमित्ताने शनिदेवाचे दर्शन घेऊन अभिषेक केल्यानंतर तरुणांना त्यांनी मार्गदर्शन केले. एकबोटे पुढे म्हणाले, संभाजी महाराज यांच्या समाधीजवळ फाल्गुन अमावास्येला मृत्युंजय दिन माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सूचनेनुसार साजरा केला जातो. महाराजांनी या दिवशी बलिदान दिले. हिंदू एकताच्या वतीने दरवर्षी धर्म व राष्ट्रासाठी काम करणाऱ्यांना पुरस्कार दिला जातो. मी मागील वर्षी तुरुंगात असल्याने पुरस्कार वितरण झाले नव्हते. हा पुरस्कार यंदा अभिनंदन यांना देण्यात आला आहे. एक लाख रुपये रोख, चांदीचे स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment