तुम्ही पाहिले आहे का आयपीएलचे थीम साँग?

IPL
23 मार्चपासून आयपीएलच्या नव्या हंगामाला सुरुवात होत असून नुकतेच या स्पर्धेचे थीम साँग रिलीज करण्यात आले आहे. विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मासह काही क्रिकेटपटू या थीम साँगमध्ये दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये नव्या दमाच्या खेळाडूंना चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आणि मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा या तिघांनी एक आव्हान केले आहे.


९० सेकंदांचे आयपीएलचे हे थीम सॉंग असून एक स्थानिक खेळाडूंचा सर्वसाधारण मुलांचा गट क्रिकेट खेळताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तर नामांकित क्रिकेटपटूंचा ग्रुप दुसऱ्या ठिकाणी क्रिकेट खेळताना दाखवला आहे. हे दोन गट खेळत असताना यांच्यात भांडण होते. अखेर हे भांडण सोडवण्यासाठी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी रोडरोलर घेऊन येतो. तो धोनी पहिल्या गटातील स्थानिक मुलांना आपल्याकडे बोलावतो. त्यानंतर ही मुले आपले नाव सांगण्याचा प्रयत्न करतात. पण कोहली-धोनी-रोहित हे तिघे त्या मुलांना नेम नहीं गेम दिखा, असे आव्हान देतात.

Leave a Comment