व्हिडीओः आपल्याच पक्षाच्या आमदाराला भाजप खासदाराने चप्पलेने बडवले

bjp
गोरखपूर – उत्तर प्रदेशमधील योगी सरकारचे प्रभारी मंत्री आशुतोष टंडन यांच्यासमोरच भाजप खासदाराने गोरखपूर येथील संतकबीरनगर जिल्हा परिषदेच्या बैठकीमध्ये आमदाराला चप्पलेने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मेहदावलचे आमदार राकेश सिंह यांना या बैठकीत खासदार शरद त्रिपाठी यांनी सर्वांसमोर चप्पलेने मारहाण केली. ही घटना घडली तेव्हा प्रभारी मंत्री उपस्थितीत होते.

(व्हिडीओ सौजन्य – Quint Hindi)
हा वाद एका स्थानिक कामाचे श्रेय घेण्यावरून झाला होता. खासदार शरद त्रिपाठींचे नाव ज्या कामाचे भूमिपूजन झाले त्याच्या शिलान्यासावर नसल्यामुळे नाराज झालेल्या खासदारांनी आपल्याच पक्षाच्या आमदाराला चप्पलेने मारहाण केली. आमदार राकेश सिंह यांचे समर्थक त्यानंतर आक्रमक झाले आणि बदला घेतल्याशिवाय खासदार त्रिपाठी यांना सोडणार नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे खासदारांना जिल्हाधिकाऱ्यांच्या रूममध्ये बंद करावे लागले होते. पक्षानेही या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल मागवला आहे.

Leave a Comment