मुकेश अंबानी जगातील 13वे श्रीमंत व्यक्ती

mukesh-ambani
मुंबई – रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी फोर्ब्सच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 13व्या स्थानावर असून पहिल्या स्थानावर अॅमेझॉनचे जेफ बेजोस आहेत तर या यादीत बिल गेट्स दुसऱ्या स्थानावर आणि वारेन बफे तिसऱ्या स्थानावर आहेत.

गेल्या वर्षी बेजोस यांची संपत्ती 19 अब्ज डॉलर होती. ती यावर्षी 131 अब्ज डॉलर झाली आहे. 2018 मध्ये मुकेश अंबानी यांची 40.1 अब्ज डॉलर संपत्ती होती. ती आता 50 अब्ज डॉलर झाली आहे. अंबानी गेल्या वर्षी या यादीत 19व्या स्थानावर होते. आता ते या यादीत 13व्या स्थानी विराजमान झाले आहेत. त्यांचे बंधु अनिल अंबानी या यादीत 1349स्थानावर आहेत.

याआधी 2017मध्ये फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या यादीत मुकेश अंबानी 33व्या स्थानावर होते. 106 भारतीय श्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी सर्वात पुढे आहेत. विप्रोचे चेअरमन अजिम प्रेमजी 22.6 अब्ज डॉलर संपत्तीनं 36व्या स्थानावर आहेत. एचसीएलचे सह संस्थापक शिव नाडर 82व्या स्थानावर आणि आर्सेलर मित्तलचे चेअरमन आणि सीईओ लक्ष्मी मित्तल 91व्या स्थानावर आहेत. हे सगळे जगातल्या 100 श्रीमंत लोकांमध्ये आहेत.

या यादीत आदित्य बिर्ला समुहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला ( 122 ), अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक गौतम अदानी ( 167 ), भारती एअरटेलचे प्रमुख सुनील मित्तल ( 244 ), पतंजलीचे सह संस्थापक आचार्य बालकृष्ण ( 365 ), पिरामल एंटरप्रायजेसचे अध्यक्ष अजय पिरामल ( 436 ), बायोकॉनचे संस्थापक किरण मुजूमदार ( 617 ), इंफोसिसचे सह संस्थापक एन आर नारायणमूर्ती ( 962 ) यांची नावे आहेत. या यादीत फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग तीन स्थान खाली आहेत, तर न्यूयाॅर्कचे माजी महापौर मायकल ब्लूमबर्ग दुसऱ्या स्थानावर आले आहेत.

Leave a Comment