क्युबाच्या फिडल कॅस्ट्रोचे ३५ हजार महिलांशी होते संबंध

castro
सर्वाधिक काळ सत्तेत असलेल्या देशाचा नेता म्हणून क्युबाचे फिडल कॅस्ट्रो यांचे नाव घेतले जाते. क्युबाचे पंतप्रधान आणि नंतर राष्ट्रपती अशी दीर्घकाळ सत्ता त्यांनी भोगली. न्यूयॉर्क पोस्टने एका अधिकार्याचा हवाला देऊन प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार कॅस्ट्रो ८२ वर्षाचे असताना त्यांचे ३५ हजार महिलांबरोबर संबंध होते. एका डॉक्युमेंटरीचा हवाला देऊन हि माहिती दिली गेली आहे.

त्यानुसार ४० वर्षांपेक्षा अधिक काळ फिडल दररोज दोन महिलांशी समागम करत असत. १९५९ साली क्रांती घडवून आणून कॅस्ट्रोनी अमेरिकी पित्तू फुल्गेकियो बतीस्ता याची हुकुमशाही उलथवून टाकली आणि क्युबाची सत्ता हस्तगत केली होती. त्यांना कम्युनिस्ट क्युबाचे जनक म्हटले जाते. महाराणी एलिझाबेथ आणि थायलंडचा राजा यांच्यानंतर सर्वाधिक काळ सत्ता उपभोगणारे कॅस्ट्रो जगातील तिसरे नेते आहेत.

fidel
१९५९ ते ७६ या काळात ते क्युबाचे पंतप्रधान होते तर १९७६ ते २००८ या काळात राष्ट्रपती होते. २५ नोव्हेंबर २०१६ ला वयाच्या ९० व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या नावाचे गिनीज रेकोर्ड असून संयुक्त राष्ट्रात सतत ४ तास २९ मिनिटे भाषण करण्याचे रेकोर्ड त्यांनी नोंदविले आहे. तसेच क्युबा मध्ये १९८६ साली त्यांनी ७ तास १० मिनिटांचे दीर्घ भाषण केले आहे.

कॅस्ट्रो यांच्याकडे उब्रेब्लांसा नावाची गाय होती. तिच्या नावावर एका दिवसात ११० लिटर दुध देण्याचे रेकॉर्ड नोंदविले गेले आहे.

Leave a Comment