कुंभमेळ्यात आकाशात उजळले ब्रह्मास्त्र

brahmastr
प्रयागराज कुंभ मेळ्यात ४ मार्च म्हणजे महाशिवरात्रीला शेवटचे शाही स्नान झाले आणि रात्रीच्या आकाशात ब्रह्मास्त्र उजळले. अर्थात हा बिग बी, रणबीर कपूर आणि आलीया भट यांच्या भूमिका असलेल्या करन जोहर याच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाचा लोगो होता. या रीतीने महाशिवरात्र, कुंभ आणि ब्रह्मास्त्र यांचे कनेक्शन झाले. हा चित्रपट २५ डिसेंबरला प्रदर्शित होणार असून त्याचे बहुतेक शुटींग बुल्गारिया मध्ये झाले आहे.

मिळालेल्या महितीनुसार या लोगोच्या प्रदर्शनासाठी आलीया भट, रणबीर कपूर पहाटेच कुंभ मेळ्यात पोहोचले होते. तेथे त्यांनी पूजा अर्चा केली आणि त्यानंतर १५० ड्रोनच्या सहाय्याने आकाशात ब्रह्मास्त्र अशी अक्षरे तयार केली गेली. हा चित्रपट ट्रायोलॉजीचा भाग असेल आणि दर दोन वर्षांनी त्याचा पुढचा भाग बनविला जाईल असे करण जोहर याने पूर्वीच जाहीर केले आहे. ही फक्त एका सुपरहिरोची कथा नाही तर भारतीय पौराणिक कथांचा त्यात समावेश असेल असेही त्याने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment