लंडन मध्ये बनले थ्री डी झेब्रा क्रॉसिंग

zebra
वाहतूक व्यवस्थेत अधिक चांगले बदल व्हावेत आणि वाहनाचे वेग आटोक्यात राहावेत यासाठी लंडन येथे थ्री डी झेब्रा क्रॉसिंग प्रायोगिक तत्वावर सुरु केले गेले आहे. लंडनच्या सेंट जोन्सवूड हायस्ट्रीट भागात त्याची सुरवात १ मार्चला केली गेली आहे. या भागात शाळा अधिक आहेत आणि मोठ्या प्रमाणावर येथे पादचारी रहदारी होते म्हणून हा प्रयोग सर्वप्रथम येथे केला गेला आहे. हा प्रयोग यशस्वी ठरला तर लंडनच्या अन्य भागात तो राबविला जाणार आहे.

विशेष म्हणजे भारताची राजधानी दिल्ली येथे या प्रकारचे थ्रीडी झेब्रा क्रॉसिंग या पूर्वीच वापरत आले आहे. याचा मुख्य उद्देश वाहनाचा वेग घटविणे आणि पादचारी वाहतूक अधिक सुरक्षित बनविणे असाच आहे. दिल्ली मध्ये त्याचा वापर सुरु झाल्यावर वाहनांचा वेग ५० किमी वरून ३० किमीवर आल्याची निरीक्षणे नोंदविली गेली आहेत. थ्री डी झेब्रा क्रॉसिंग मध्ये पट्टे अश्या प्रकारे रंगविले जातात की ते जणू तरंगते ब्लॉक आहेत असा भ्रम निर्माण होतो त्यामुळे येथे येताना वाहनांचा वेग आपोआप कमी होतो. परिणामी पादचारी सुरक्षित आणि शांतपणे रस्ता ओलांडू शकतात.

Leave a Comment