रॉजर फेडररचे विजयाचे शतक

rojer
पुरुष एकेरी टेनिस सामन्यात शनिवारी दुबई टेनिस चँपियनशिप मध्ये स्टिफेनोज सिर्सीपस याला हरवून टेनिसचा महान खेळाडू रॉजर फेडरर यांने पुरुष एकेरीतील १०० व्या विजयाची नोंद केली. ही कामगिरी करणारा तो दुसरा टेनिस पटू ठरला. अमेरिकेच्या जिमी कॉनर्स याने पुरुष एकेरी मध्ये १०९ वेळा विजय मिळविला आहे.

रॉजरचे टेनिस करिअर खऱ्या अर्थाने सुरु झाले ते २००१ पासून. त्याने २००५ पर्यंत ३३ खिताब जिंकले होते तर २००६ ते १० या काळातही ३३ विजेतेपदे मिळविली होती. २०११ ते १५ या काळात २२ तर २०१६ ते २०१९ या काळात ही संख्या १२ आहे. रॉजर ने हार्ड कोर्टवर सर्वाधिक म्हणजे ६९ वेळा विजय नोंदविला आहे तर ग्रास कोर्टवर १८, क्ले कोर्टवर ११ तर कार्पेट सरफेसवर २ विजेतेपदे मिळविली आहेत. त्याला १०० विजेतेपदासाठी १५२ अंतिम फेरीचे सामने खेळावे लागले तर जिमी कॉनर्सने १०० विजेतेपदासाठी १४० अंतिम सामने खेळले आहेत.

विशेष म्हणजे सिंगल मध्ये महिला आणि पुरुष कॅटेगरीत सर्वाधिक विजेतेपदे मिळविण्याचे रेकॉर्ड मार्टिना नवरतीलोव्हा हिच्या नावावर असून तिने महिला एकेरीची १६७ विजेतेपदे मिळविली आहेत.

Leave a Comment