विद्युत जामवालने शेअर केली ‘जंगली’ची नवी झलक

vidyut-jamwal
सध्या आपल्या आगामी ‘जंगली’ चित्रपटाच्या शूटींगमध्ये कमांडो फेम अभिनेता विद्युत जामवाल व्यस्त आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विद्युत या चित्रपटात एका महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचा टीजर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. आता नुकताच या या चित्रपटाचा एक काही सेकंदाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

विद्युत या व्हिडिओमध्ये खतरनाक स्टंट साकारताना दिसत आहे. हा व्हिडिओ विद्युतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्याने या व्हिडिओला जंगलाकडूनच प्रशिक्षण घेऊन ‘जंगली’ बनलो आहे, असे कॅप्शन दिले असून या चित्रपटाचा ट्रेलर ६ मार्च रोजी रिलीज करण्यात येणार आहे.


विद्युतचे हत्तीसोबतचे असलेले घनिष्ठ नाते ‘जंगली’ चित्रपटात उलगडण्यात येणार आहे. तो या चित्रपटात थरारक स्टंटही साकारताना दिसणार आहे. या चित्रपटासाठी हॉलिवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक शक रसेल कष्ट घेत आहेत. हा चित्रपट ५ एप्रिलला प्रदर्शित होईल.

Leave a Comment