‘बदला’साठी रॅपर झाले महानायक

amitabh-bachhan
आगामी बदला हा चित्रपट घेऊन बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तापसी पन्नू प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलर प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिल्यानंतर नुकतेच या चित्रपटातील औकात हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचे वैशिष्ट्ये म्हणजे यात महानायक चक्क रॅप गाणे गायले आहे.

यात बिग बींचा रॅपर अंदाज पाहायला मिळतो. तापसी पन्नुवर चित्रीत झालेले ‘क्यो रब्बा’ हे गाणे यापूर्वी प्रदर्शित करण्यात आले होते. अरमान मलिकने हे गाणे गायले आहे. या गाण्याला सोशल मीडियावर भरभरुन लाईक्स मिळाले. आता बिग बींच्या रॅप गाण्यालाही चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

यापूर्वी या चित्रपटाचे तीन पोस्टर रिलीज करण्यात आले होते. ”माफ कर देना हर बार सही नही होता” अशी अमिताभ आणि तापसी यांची छबी असलेल्या या तिन्ही पोस्टरवर ओळ होती. आता चौथ्या पोस्टरवरही याच ओळी पाहायला मिळत आहेत. बदलामध्ये प्रेक्षकांना दमदार संवाद, रहस्य आणि थ्रिलर पाहायला मिळणार आहे.

सुजय घोष यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर गौरी खान, सुनिर खेत्रपाल आणि अक्षय पुरी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट येत्या ८ मार्च रोजी रिलीज होणार आहे.

Leave a Comment