सलमानची निर्मिती असलेल्या ‘नोटबुक’मधील पहिले गाणे रिलीज

notebook
बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खान याची निर्मिती असलेल्या आणि याचित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रनूतन बहल आणि जहिर इक्बाल यांच्या नोटबुक या चित्रपटातील पहिले वहिले गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचे बोल ‘तुझ बिन नहीं लगदा जी’ असे असून त्यात प्रनूतन बहल आणि जहिर इकबाल यांची खास झलक पाहायला मिळत.

हे गाणे सलमान खानने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहे. काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याची खास झलकही प्रेमातील दुराव्याची व्यथा सांगणाऱ्या या गाण्यात पाहायला मिळते. विशाल मिश्रा आणि असीस कौर यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने या गाण्याला अधिक खास बनवले आहे.

हे गाणे अक्षय त्रिपाठीने शब्दबद्ध केले आहे. तर विशाल मिश्रा यांचेच गाण्याला संगीतही आहे. प्रेक्षकांना चित्रपटात प्रनूतन आणि जहिरच्या प्रेमाची अनोखी कथा पाहायला मिळणार आहे. वेगळ्या आशयाची प्रेमकथा असलेल्या या चित्रपटातून हे दोन्ही कलाकार बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कक्कर यांनी केले असून २९ मार्चला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment