
सध्याच्या घडीला भारत आणि पाकिस्तान या दोन्ही उभय देशांमध्ये तणावाची स्थिती असतानाच बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत हिने वेगळाच सुर आळवला असून कायम चर्चेत रहावे यासाठी काही ना काही करणारी राखी सावंत यावेळी पाकिस्तानसोबत युद्ध करण्यास सज्ज झाली आहे.
राखी सावंत म्हणते, मानवी बॉम्ब बनवून मला पाकिस्तानात फेका
नुकतीच राखी एका कार्यक्रमासाठी लुधियानाला आली होती, त्याच दरम्यान डब्ल्यूडब्ल्यूईचा खेळाडू ग्रेट खली हा देखील उपस्थित होता. या कार्यक्रमादरम्यान बोलताना राखी सावंत आपण वेळप्रसंगी देशासाठी प्राण त्याग करण्यासही तयार असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर माझ्या शरीराभोवती भरपूर बॉम्ब लावून मला पाकिस्तानात फेकले तरी मी मागे हटणार नाही, असे देखील म्हटले आहे.
राखीने यापूर्वी पाकिस्तानला धमकी देणारा व्हिडिओ शेअर केला होता. ‘पाकिस्तान वालों तुमने जो हमारे पायलट को पकडा है, उसे छोड दो. अगर राखी सावंत को ज्यादा गुस्सा आ गया, तो राखी सावंत तुम्हारे पाकिस्तान में आ जाएगी,’ असे राखीने या व्हिडिओत म्हटले होते.
