आलोक नाथ ‘मीटू’वरील आधारित चित्रपटात बनणार न्यायाधीश!

alok-nath
गतवर्षी हिंदी सिनेसृष्टीवर ‘मीटू’नावाचे वादळ आले होते. त्या वादळात बॉलीवूडमधील अनेक दिग्गज अडकले होते. या वादळात बॉलीवूडचे ‘संस्कारी बाबू’ म्हणजेच अभिनेते आलोक नाथ यांचा देखील या वादळात समावेश होता. आलोक नाथ यांच्यावर निर्मात्या-लेखिका विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केला. त्याचबरोबर त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केला होता. त्यानतंर आलोक नाथ यांच्यावर सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशननेही बंदी लादली होती. पण तेच आलोक नाथ आता ‘मीटू’ मोहिमेवर आधारित एका चित्रपटात न्यायाधीशांची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

या वृत्ताला खुद्द आलोक नाथ यांनी दुजोरा दिला आहे. आलोक नाथ ‘मीटू’ मोहिमवर आधारित ‘मैं भी’ या चित्रपटात जजच्या भूमिकेत दिसतील. हा चित्रपट नासीर खान दिग्दर्शित करत आहेत. आलोक नाथ यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता, या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. या चित्रपटात मी असून याबाबत तुम्हाला काही त्रास आहे का की मी या चित्रपटात दिसणार, याचे तुम्हाला दु:ख वाटत आहे? असा उलट सवाल त्यांनी केला. सध्या कुठल्याही चित्रपटात मी काम करत नाही. पण या चित्रपटाचे शूटींग आधीच पूर्ण झाले होते. एका गरिब निर्मात्यांच्या शब्दाखातर मी ही भूमिका स्वीकारली. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होऊ द्या, असे ते म्हणाले.

Leave a Comment