प्रेक्षकांच्या भेटीस आले ‘केसरी’मधील पहिले वहिले गाणे

kesari
बॉलीवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार सारागढीच्या लढाईवर आधारित ‘केसरी’ या चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. प्रेक्षकांचा ज्याला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता चित्रपटातील पहिले वहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे.

या गाण्याचे ‘सानू केहंदी’ असे बोल असून शीख रेजिमेंटच्या सैनिकांचा खास डान्सही या गाण्यात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केले आहे. तर रोमी आणि ब्रिजेश शांडिल्य यांनी गाण्याला आवाज दिला असून हा आवाज प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आहे.

त्या २१ शीख सैनिकांची कथा ‘केसरी’ चित्रपटात दाखविण्यात येणार आहे, ज्यांनी हार पत्करण्यापेक्षा लढून मृत्यूस सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आणि सुमारे १० हजार अफगाण्यांसोबत २१ शीख सैनिकांनी लढाई केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग यांनी केले आहे. हा चित्रपट येत्या २१ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment