महेश बाबू रूपेरी पडद्यावर उलगडणार २६/११ च्या हल्ल्यातील हिरोची कथा

mahesh-babu
मुंबईवर १० वर्षांपूर्वी झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याची आठवण जरी झाली आपले मन सुन्न होऊन जाते. या हल्ल्यात आपल्या अनेक वीर जवानांना दहशतवाद्यांशी दोन हात करताना हौतात्म्य आले. यातीलच एक रिअल हिरो म्हणजे मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची शौर्यगाथा आता रूपेरी पडद्यावर उलगडणार आहे. मेजर संदीप हे मुंबईवरील हल्ल्यावेळी ताज पॅलेस हॉटेलमध्ये दहशतवाद्यांचा सामना करताना शहीद झाले होते.


मेजर संदीप उन्नीकृष्णन हे त्यावेळी राष्ट्रीय सुरक्षा पथकामध्ये (एनएसजी) कमांडो होते. या बायोपिकमधून त्यांची हीच कथा मांडण्यात येणार असून याबद्दलची माहिती दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूने सोशल मीडियावर शेअर केली आहे. या चित्रपटात मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका अभिनेता अदिवी सेश साकारणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती महेश बाबूची जीएमबी एंटरटेनमेंट संस्था करणार आहे. हा चित्रपट तेलुगू आणि तामिळ अशा २ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘मेजर’ असे शीर्षक असून हा चित्रपट २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Comment