अभिनंदनच्या केसालाही धक्का लागता कामा नये, पाकिस्तानला भारताचा संदेश

abhinanadan-vardhman
नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान सध्या पाकिस्तानच्या ताब्यात असून त्यांच्या सहीसलामत घरवापसी केंद्र सरकारकडून हालचाली सुरु झाल्या असून केंद्रातील मोदी सरकारच्या अजेंड्यावर हाच मुद्दा आहे. अभिनंदन यांच्या केसालाही धक्का लागता काम नये, अशा कठोर शब्दात पाकिस्तान सरकारला भारताने ठणकावले आहे. त्याचबरोबर त्यांना योग्य वागणूक दिली जाईल, असे पाकिस्तानी लष्कराकडून सांगितले गेले आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १९४९च्या जिनेव्हा परिषदेनुसार युद्धातील लष्करी कैद्यांना देण्यात येणाऱ्या वागणुकीविषयी एक मार्गदर्शिका करण्यात आली आहे. भारतीय आणि पाकिस्तानी लष्कर तसेच बीएसएफ आणि पाकिस्तानी रेंजर्स यांच्यात एक अनौपचारिक सामंजस्यपणा यात आहे.

दरवर्षी किमान तीन वेळा अशा सीमारेषा ओलांडण्याच्या घटना घडतात. त्या सैनिकाची किंवा कर्मचाऱ्याची अशावेळी ओळख पटली की काही तासांत किंवा काही दिवसांत परत पाठवले जाते. संबंधित व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करून त्याला हस्तांतरित केले जाते.

दरम्यान, जिनेव्हा परिषदेत वैमानिकांसाठीच्या प्रकरणात कोणतीही वेळ निश्चित केलेली नाही. दिल्ली आणि इस्लामाबाद अशावेळी दोघेही योग्य कालावधी मान्य करतील. पाकिस्तानी सरकारला वर्धमान यांना त्वरीत आणि सुरक्षित परत पाठवण्यास केंद्र सरकारने सांगितले आहे. जेव्हा भारतीय वायूसेनेचे वैमानिक १९९९ मध्ये के नचिकेत यांना पाकने पकडले होते. त्यावेळी पाकने नचिकेत यांना ८ दिवसानंतर सोडून दिले होते.

Leave a Comment