लवकरच छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आणखी एक स्टारकीड

shweta-tiwari
काही वर्षांपूर्वी टीव्हीवर अतिशय लोकप्रिय झालेल्या ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेमध्ये कथानकाची नायिका ‘प्रेरणा’च्या भूमिकेने अभिनेत्री श्वेता तिवारीला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले. आता श्वेताची कन्या पलक ही देखील छोट्या पडद्यावर पदार्पण करण्यास सिद्ध झाली असून, पलक भूमिका करीत असलेली मालिका लवकरच प्रसारित केली जाणार असल्याचे समजते. पलकचे आय अठरा वर्षांचे असून, सोशल मिडीयावर पोस्ट करीत असलेल्या अनेक छायाचित्रांच्या मुळे पलक प्रसिद्धीच्या झोतात असते.
shweta-tiwari1
पलक भूमिका करीत असलेल्या मालिकेचे नाव ‘ये रिश्ते हैं प्यारके ‘ असून, या मालिकेमध्ये पलक एक लहानशी भूमिका, म्हणजेच ‘कॅमियो’ साकारत आहे. या भूमिकेसाठी पलक उत्तम असल्याचे निर्मात्यांना वाटल्यामुळे त्यांनी ही भूमिका तिला देऊ केल्याचे समजते. पलक करीत असलेली भूमिका आणि तिचा अभिनय प्रेक्षकांना पसंत पडेल अशी खात्री या मालिकेच्या दिग्दर्शक-निर्मात्यांना आहे. सध्या या मालिकेचे चित्रीकरण भुज येथे सुरु असून, मार्च महिन्यामध्ये या मालिकेचे प्रसारण सुरु होणार असल्याचे सांगण्यात येते.
shweta-tiwari2
या मालिकेमध्ये शहीर शेख आणि रिया शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असून, ही मालिका स्टार प्लस वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेमध्ये अभिनेता ऋत्विक अरोरा याची भूमिकाही असणार आहे. ऋत्विकची नायिका म्हणून या मालिकेमध्ये पलकला भूमिका दिली गेल्याचे समजते. पलक टीव्हीवर दिसण्यापूर्वीच सोशल मिडीयाच्या माध्यमातून तिची लोकप्रियता वाढली आहे. इन्स्टाग्रामवर पलकचे अडीच लाखांहूनही अधिक फॉलोअर्स आहेत. पलकने अलीकडेच केलेल्या फोटो शूटमधील छायाचित्रे सोशल मिडियावर सध्या खूप लोकप्रिय होत आहेत.

Leave a Comment