अशी केली जाते ऑस्कर पुरस्कारांसाठी चित्रपटांची निवड.

oscar
९१वा ऑस्कर समारोह नुकताच पार पडला असून या पुरस्कार समारंभामध्ये एकूण चोवीस निरनिराळ्या ‘कॅटगरीं’साठी पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. यंदाच्या पुरस्कार समारंभाचे वैशिष्ट्य असे, की यंदा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिजिटल होते. जर या पुरस्कारांसाठी नामांकित चित्रपटांच्या बद्दल बोलायचे झाले, तर या चित्रपटांचे चयन करण्याची प्रक्रिया मोठी रोचक आहे. एका वर्षाच्या काळामध्ये सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या चित्रपटांच्या पैकी केवळ नऊ चित्रपट अंतिम चयनाच्या टप्प्यापर्यंत पोहोचतात. त्यानंतर या नऊ पैकी पाच चित्रपट अंतिम फेरीमध्ये निवडले जाऊन अखेरीस एका चित्रपटाचे पुरस्कारासाठी चयन केले जाते.
oscar1
ऑस्कर पुरस्कार कोणत्या चित्रपटाला दिला जाणार हे ठरविण्याची जबाबदारी ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’, व ‘अकाऊंटिंग कंपनी प्राईस वॉटरहाउस कूपर्स’ यांच्या सभासदांची असते. या दोन्ही संस्थांची मिळून सुमारे सहा हजार मेम्बर्सची टीम असून, एखाद्या चित्रपटाला नामांकन देण्यापूर्वी त्या चित्रपटाची योग्यता सर्वार्थाने तपासून पाहण्याची जबाबदारी या सभासदांची असते. या सभासदांच्या टीममध्ये अभिनेते, दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर्स, फिल्म एडीटर्स, मेकअप आर्टिस्ट्स, संगीतकार, निर्माते, साऊंड, व्हिज्युअल आणि अॅनिमेशन तज्ञ, पब्लिक रिलेशन्स विशेषज्ञ, लेखक, इत्यादी मंडळींचा समावेश असतो.
oscar2
चित्रपट निर्मात्यांना आपले चित्रपट या सभासदांसमोर प्रस्तुत करावे लागत असून चित्रपटाचे चयन होण्यासाठी आवश्यक मते मिळविण्यासाठी थियेटर बुकिंग्ज, स्क्रीनिंग, चहापाणी इत्यादी व्यवस्थेवरही चित्रपट निर्माते पाण्यासारखा पैसा खर्च करीत असतात. चित्रपट नामांकित करताना सभासदांनी आपले व्होट दिल्यानंतर या चित्रपटांचे रँकिंग ठरते. ज्या चित्रपटाचे सर्वोच्च रँकिंग असते, त्या चित्रपटाला पुरस्कार देण्यात येतो.

Leave a Comment