तुटलेल्या हृदयाची वेदना सांगणार ‘बदला’ चित्रपटातील हे गाणे

badla
पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तापसी पन्नु येत असून नुकताच त्यांच्या आगामी आगामी ‘बदला’ या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. ट्रेलरमध्ये असणारे दमदार संवाद, रहस्य आणि थ्रिल चित्रपटाबद्दलची वाढवणारे होते. आता नुकतेच या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे.

अरमान मलिक याने तुटलेल्या हृदयाची वेदना सांगणारे हे इमोशनल गाणे गायले आहे. तर हे गाणे अमाल याने संगीतबद्ध केले असून कुमार याने गाण्याचे बोल लिहिले आहेत. सुजॉय घोष हे ‘बदला’ चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट ८ मार्चला प्रदर्शित होणार आहे. तर, या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खानची रेड चिलीज एंटरटेनमेंट करत आहे.

Leave a Comment