प्रविण तरडे उलगडणार ‘सरसेनापती हंबीरराव’ यांचा जीवनप्रवास

pravin-tarade
लवकरच रुपेरी पडद्यावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती आणि संभाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा जीवनप्रवास पाहायला मिळणार आहे. सरसेनापती हंबीरराव मोहिते हे आपल्या दबदबा आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्वासाठी ओळखले जात होते. दरम्यान हा चित्रपट मुळशी पॅटर्न फेम सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे साकारणार आहेत. त्यांनी नुकतीच याची घोषणा केली आहे.

शिवनेरी फाउंडेशन या भव्य, ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करत असून चित्रपटाचे संदिप रघुनाथराव मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाषजी बोरा हे निर्माते आहेत. तर प्रविण विठ्ठल तरडे यांची चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असणार आहे.

प्रविण तरडे चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे हंबीरराव मोहिते हे सरसेनापती होते. आपल्या चाणाक्ष बुद्धीने त्यांनी स्वराज्याला श्रीमंत केले. मराठा साम्राज्य हंबीरराव मोहितेंच्या नजरेतून या चित्रपटात बघायला मिळेल. या चित्रपटात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज, नामवंत कलाकार दिसणार आहेत. तर हंबीरराव यांच्या प्रमुख भूमिकेत कोण? याचा उलगडा शिवराज्याभिषेक दिन म्हणजेच ६ जून २०१९ रोजी होणार आहे. २०२० मध्ये हा चित्रपट जानेवारी प्रेक्षकांच्या भेटीला येईल असेही तरडे यांनी सांगितले.

Leave a Comment