मोदींच्या विरोधात तगडा उमेदवार देणार समाजवादी पक्ष

alliance
नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाचे उत्तर प्रदेशातील जागावाटप झाले असून समाजवादी उत्तर प्रदेशातील 80 लोकसभा मतदारसंघातील 37 जागांवर उमेदवार देणार आहे तर 38 जागांवर बहुजन समाज पक्षाचे उमदेवार निवडणूक लढवणार आहेत. तर 3 जागा राष्ट्रीय लोकदलाला 3 जागा देण्यात आल्या आहेत.

गुरुवारी जागावाटपावर अखिलेश यादव आणि मायावती यांनी शिक्कामोर्तब केले असून दोन्ही पक्षांचे मतदारसंघही यावेळी निश्चित करण्यात आले आहेत. सपा बसपा अमेठी आणि रायबरेली या दोन मतदारसंघात आघाडी उमेदवार उभे करणार नाही. तर समाजवादी नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसीमधून उमेदवार उभा करणार आहे.

दरम्यान, या आघाडीवर समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी नाराजी दर्शवली आहे. ते लखनौमध्ये पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी बहुजन समाज पक्षाला अर्ध्या जागा दिल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आपण राज्यात समाजवादी पक्षाची मोठी ताकद निर्माण केली होती. तीन वेळा मुख्यमंत्री आणि केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून आपण काम पाहिले. पण, आता पक्षातील लोकच पक्ष कमकुवत करत आहेत असे मुलायमसिंह म्हणाले.

Leave a Comment