अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित ‘केसरी’चा ट्रेलर रिलीज

kesari
बॉलीवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार लवकरच आपल्या बहुप्रतिक्षित केसरी या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा थरारक ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. प्रेक्षकांना या ट्रेलरमध्ये सारागढीच्या लढाईची जबरदस्त झलक पाहायला मिळत आहे. ट्रेलरमधील अक्षय कुमारचे डायलॉग देखील लक्षणीय आहेत.

सुमारे १० हजार अफगाण्यांनी १२२ वर्षांपूर्वी २१ शीख सैनिकांवर हल्ला केला होता. शिखांनी त्यावेळी हार पत्करण्यापेक्षा लढून मृत्यूस सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. काही लष्करी इतिहासकारांनी याच कारणास्तव या लढाईला इतिहासातील सर्वात महान लढ्याची उपमा दिली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने हाच लढा आता प्रेक्षकांना पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.

या लढाईशिवाय परिणीती चोप्राची काही सेकंदाची झलकही ट्रेलरमध्ये तिच्या चाहत्यांना पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांच्या नक्कीच वीरता आणि शौर्याची कथा असलेला हा ट्रेलर पसंतीस उतरेल यात शंका नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग यांनी केले असून हा चित्रपट येत्या २१ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment