तुम्हाला घ्यायचे आहेत का 57 हजाराचे मळलेले बूट ? - Majha Paper

तुम्हाला घ्यायचे आहेत का 57 हजाराचे मळलेले बूट ?

shoes
आपल्यातील कित्येकजण आपले स्टेट्स राखण्यासाठी महागडे चप्पल आणि बूट खरेदी करतात. त्यासाठी ते कितीही पैसे मोजण्यास तयार असतात. पण यामध्ये आता गुस्सी (GUCCI) या आंतरराष्ट्रीय ब्रँडने आणखीन एक नवीन ट्रेंड आणला आहे. ही कंपनी तुम्हाला चक्क मळलेले शूज विकणार असून कंपनीने या ब्राँडला डर्टी शूज् (Dirty Shoes) असे नाव दिले आहे. नामांकित ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ब्रँडने आपल्या नवीन कलेक्शनमध्ये या शूजचा समावेश केला आहे.

व्हिंटेज लूक या शुजला देण्यात आला असून ते ऑफव्हाईट रंगात उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर पॉलिश नसलेले लेदर यासाठी वापरण्यात आले. विशेष म्हणजे या मळक्या शूजसाठी कंपनीने ६१५ पाऊंड म्हणजेच भारतीय चलनात ५७,०७८ रुपये एवढी किंमत ठेवली आहे. हे शूज ग्राहकांना कंपनीच्या अधिकृत दुकानात किंवा ऑनलाईन खरेदी करता येतील असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. सध्या या शूजच्या किंमतीवरुन सोशल मीडियात चर्चा रंगली आहे.

Leave a Comment