तुम्ही पाहिला आहे का सुजय डहाकेच्या ‘सेक्स, ड्रग्ज & थिएटर’चा टीझर

web-series
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला सुजय डहाके यांची नवी वेबसिरीज ‘सेक्स, ड्रग्ज & थिएटर’ येणार असून या वेबसिरीजचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांपासून उत्तम आशयावर आधारित वेबसिरीजची निर्मिती मराठी कलाविश्वातही होताना दिसत आहे. अनेक बोल्ड विषय या सिरीजच्या माध्यमातून सादर केले जात आहेत. यातलीच ‘सेक्स, ड्रग्ज & थिएटर’ ही नवी वेबसिरीज आहे. या सिरीजमध्ये तुम्हाला सहा महाविद्यालयीन तरुणांच्या मैत्रीतून उलगडत जाणारी कथा पाहायला मिळणार आहे.

या सिरीजमध्ये शालवा किंजवडकर, मिताली मयेकर, नयना मुके, आदिश वैद्य, सुयश झाझुरके, अभिषेक देशमुख, सुजय डहाके आणि सुनील बर्वे यांच्या मुख्य भूमिका आहेत. ही वेबसिरीज येत्या ५ मार्चपासून झी फाईव्ह या अॅपवर सुरू होणार आहे.

Leave a Comment