९८.५ टक्क्यांसह ज्युनिअर इंजिनीअरची परीक्षा पास झाली सनी लिओन!

sunny-leone
बॉलीवूडची बेबी डॉल सनी लिओनने बिहारमधील सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागात कनिष्ठ अभियंता पदासाठी आलेल्या अर्जांमध्ये टॉप केले आहे. पण तिच्या अर्जामुळे बिहारचे सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग चांगलाच चर्चेत आला आहे.

१५ ते ३१जानेवारी दरम्यान कनिष्ठ अभियंता पदासाठी सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने अर्ज मागवले होते. डिप्लोमा ऑफ इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्याची अट यासाठी ठेवण्यात आली होती. या पदासाठी जवळपास १७ हजार इच्छुकांनी केला होता. त्यात सनी लिओनच्या अर्जाचा देखील समावेश आहे. अर्जाच्या यादीत सनी लिओनचे नाव आल्याने अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. त्याच बरोबर अर्जदाराने आपण ९८.५ टक्क्यांनी उत्तीर्ण झाल्याचा उल्लेख केला आहे.

याबाबत माहिती देताना सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाचे संयुक्त सचिव (व्यवस्थापन) अशोक कुमार यांनी सांगितले की, सनी लिओन नावाने आमच्याकडे एक अर्ज मिळाला असून त्यात लिओना लिओन असा वडिलांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर 13 मे 1991 असा जन्मतारखेचा उल्लेख करण्यात आला. अर्जदार तरुणीने आपल्या अर्जात ९८.५ टक्क्यांसहित डिप्लोमा ऑफ इंजिनिअरिंग केल्याची माहिती दिली आहे. हा अर्ज खरा आहे की खोटा याची खात्री झालेली नाही.

Leave a Comment